Wednesday, 7 August 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा एक महिन्यात उभारण्याचा मंत्री महोदयांचा आदेश !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा एक महिन्यात उभारण्याचा मंत्री महोदयांचा आदेश !!
 

**आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीला यश
       
      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे माणगाव रायगड येथील प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा एक महिन्याच्या आत उभारण्यात यावा, तसेच विविध समस्या वरील आढावा बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मागणीनुसार आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. 

      या बैठकीसाठी उपस्थित लोणेरे विद्यापीठाचे कुल गुरु, उपकुलसचिव, आमदार महेंद्र थोरवे तसेच संबंधित अधिकारी इत्यादी उपस्थित होते. चंद्रकांत दादा पाटील यांनी कॉलेज मधील विविध तक्रारी संदर्भात मुद्दा उपस्थित करत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवरायांचा पुतळा एक महिन्याच्या आत उभारण्यात आला पाहिजे असे मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला आदेश दिले. यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कॉलेजच्या विविध मागण्यांना देखील तात्काळ मान्यता दिली.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...