Thursday, 3 October 2024

कोकण सुपुत्र उद्योजक तुकाराम शेठ शिंदे राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित !

कोकण सुपुत्र उद्योजक तुकाराम शेठ शिंदे राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित !

घाटकोपर (शांताराम गुडेकर) :

             पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावचे सुपुत्र उद्योजक तुकारामशेठ शिंदे यांना यंदाचा राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श रायगड वृत्त वाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. तुकारामशेठ शिंदे यांनी मुंबईत येऊन खूप कमी वेळेत आपल्या कार्याचा सेवेचा ठसा उमठवला .आपला व्यवसाय सांभाळत त्यांनी राज्यात असंख्य मुलांना रोजगार देऊन त्यांना उभे केले. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षण प्रवाहात त्यांना प्रोत्साहित केले आहे. शिंदे यांचे हे कार्य पाहून त्यांना यंदा उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...