शिवसेना (उबाठा ) शिव आरोग्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 तर्फे आदिवासी पाड्यातील बहिणींना साड्या व दिवाळी फराळ,लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट वाटप !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023- 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे, शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या आदेशानुसार आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व लायन्स क्लब ऑफ मिडटावूनचे प्रथम व्हि.पी. लायन श्री.जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा व लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने २ नोव्हें.२०२४ रोजी पांचवड अदिवासीपाडा, येऊर, ठाणे (प) येथे दिवाळी व भाऊबीज निमीत्त आदिवासी पाड्यातील बहिणींना साड्या व दिवाळी फराळ तसेच लहान मुलांना चॉकलेट बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम करून दिवाळी साजरी केली. याप्रसंगी नवी मुंबई संपर्क समन्वयक श्री.प्रताप गाथे, ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक श्री. एकनाथ अहिरे, जिल्हा आरोग्य सह संघटक श्री.राजेंद्र शिंदे, जेष्ठ शिवसैनिक श्री.विठ्ठल भुईंबर, उप विभागप्रमुख श्री.वसंत गावित, ठाणे जिल्हा समन्वयक सहसचिव श्री.सचिन त्रिवेदी, विधान.आरोग्य सह सचिव श्री.ऊल्हास शिवणेकर, विधान.सह समन्वयक श्री.देवशी राठोड, श्री.अजय राणे, विधान. समन्वय सचिव श्री.अजिम शेख, सहसचिव सौ.अक्षता पांचाळ, विधान. आरोग्य सह संघटक श्री.सुरेश भोसले आरोग्य सैनिक सौ.नाझ पाशा, डॉ.सौ.रेखा भुईंबर, सौ.ऊर्मीला गावित, सौ.प्रमीला गावित, श्री.रोहित भाईजे, श्री.अजित माने, श्री.नंदकुमार सावंत, कु.सुशांत भुईंबर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment