Sunday 3 November 2024

येऊर येथील शाळेत निसर्ग क्रीडा संवादने भरवला आनंदमेळा !!

येऊर येथील शाळेत निसर्ग क्रीडा संवादने भरवला आनंदमेळा !!

ठाणे, प्रतिनिधी : रौप्य महोत्सवी वर्षांत वाटचाल करणा-या निसर्ग क्रीडा संवाद संस्थेने आज भाऊबीजच्या निमित्ताने येऊरच्या रहिवाशी व मुलांसोबत  दि.३ / ११ / २०२४ रोजी पंडित विद्यालय, पाटोणापाडा येथे आनंदमेळा साजरा केला.

     पंडित विद्यालय, पाटोनपाडा येथे १९९९ मध्ये विद्यार्थ्यांकरता व्यक्तिमत्त्व विकास शिबीर घेऊन निसर्ग क्रीडा संवाद संस्थेची स्थापना झाली. आज रौप्य महोत्सवी वर्षांत या संस्थेने प्रवेश केला गेली. २५ वर्षांत पर्यावरण व क्रीडा क्षेञात काम करत आहेत. आज आनंदमेळ्यात गायक मोहनिश कळसकर व गायिका डाॅ. कविता पाटील तसेच संतोष देवरे यांनी सुंदर गाणी गाऊन मुलांची व प्रेक्षकांची मने जिंकली यानंतर मुलांना फराळ वाटप व व्यास क्रिएशन तर्फे गोष्टीची पुस्तके देण्यात आली.
    
    येऊरच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या मेहेंदळे मॅडम व कविता मोकाशी मॅडम तसेच मा. वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे, कमलेश चव्हाण, विश्वंभर शिंदे, सी. डी. देशमुख अभ्यासिकेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, मारुती लांडे, विक्रम पाटिल, किशोर चव्हाण,  प्रदिप महाले, रवी देसले, ञिंबक गवारे, गोपाळ ठाकूर व ज्ञानरत्न मिञ परिवार यांनी मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष डाॅ.एकनाथ पवळे यांनी सुञसंचालन केले व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मारुती चव्हाण यांनी केले.

No comments:

Post a Comment

आशालता रामनाथ वडके यांचे निधन !

आशालता रामनाथ वडके यांचे निधन ! मुंबई (प्रतिनिधी) :            मझगाव मुरुड जंजिरा जि. रायगडच्या राहिवाशी व हुतात्मा कमलाकर दांडे...