Wednesday, 27 November 2024

व्हर्टेक्स आग दुर्घटनेवरून केडीएमसी प्रशासनावर आमदार विश्वनाथ भोईर यांची आगपाखड...

 
व्हर्टेक्स आग दुर्घटनेवरून केडीएमसी प्रशासनावर आमदार विश्वनाथ भोईर यांची आगपाखड...

** महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुमती जाखर यांनी जबाबदारी घ्यावी - आमदार विश्वनाथ भोईर 

कल्याण पश्चिमेतील हायफाय सोसायटी असलेल्या व्हर्टेक्स इमारतीमधील आगीच्या घटनेवरून आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. बहुमजली इमारतीमधील आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी उंच शिडीची गाडी ही बंद असून तिच्या दुरुस्तीची फाईल ही केडीएमसी अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिने रखडवून का ठेवली? या गाडीच्या दुरुस्तीचे गांभीर्य या अधिकाऱ्यांना नव्हते का? जर या आगीच्या दुर्घटनेत लोकांचे जीव गेले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असे संतप्त सवाल विचारत हे पूर्णपणे केडीएमसी प्रशासनाचे अपयश असल्याची टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली.

केडीएमसी प्रशासनाच्या प्रमुख म्हणून आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. जर आपण नागरिकांकडून कर गोळा करतो तर नागरिकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करणे हे केडीएमसी प्रशासनाचे आद्यकर्तव्य असल्याची सांगत आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला आपल्या जबाबदारीबाबत आठवण करून दिली. तसेच यापुढे तरी अशा घटना घडू नये यासाठी केडीएमसी प्रशासनाने तत्पर राहावे अन्यथा सत्तेमध्ये असूनही आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल असा सज्जड इशाराही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला आहे.

No comments:

Post a Comment

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर !

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर !      ठाणे, दि. ३० - सन 2025 मध्ये...