राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी !!
राजापूर, (केतन भोज) : २६७ राजापूर,विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल दि. २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर निकालावरती संशय निर्माण झाल्यामुळे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदविला असल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन साळवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. दि.२६ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक निकाल लागल्यानंतर ७ दिवसाच्या आतमध्ये EVM व VVPAT च्या पडताळणीची मागणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करु शकतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने मतदान केंद्र क्रमांक २- चाफवली व २०० - तुळसवडे चे EVM मायक्रो कंट्रोलर व VVPAT ची पडताळणी करुन निर्माण झालेला संशय दूर करावा असे निवेदन दिल्याची माहिती माजी आमदार राजन साळवी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment