Thursday, 14 November 2024

संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न !!

संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसैनिक व पदाधिकारी मेळावा पाटीदार वाडी हॉल, एलबीएस मार्ग घाटकोपर पश्चिम या ठिकाणी पार पडला. यावेळी शिवसेना नेते आमदार अनिल परब व ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केले. घाटकोपर पश्चिमेत शिवसेनेचा भगवा फडकवणार संजय भालेराव यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार असा निर्धार यावेळी सर्व शिवसैनिकांनी केला.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...