विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनला 84 लाखांची देणगी !
** एसबीआय सिक्युरिटीजचे 100 विद्यार्थांसाठी कौतुकास्पद कार्य
मुंबई, (केतन भोज) : एस बी आय सिक्युरिटीजने अल्पभूधारक ग्रामीण समुदायातील 100 विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्यातील रोजगारासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनला 84,00,000 लाख रुपये देणगी देण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. रॉनी आणि जरीना स्क्रूवाला यांनी स्थापित केलेले, स्वदेस फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यांद्वारे ग्रामीण भारताला सशक्त बनविण्याच्या उद्देशाने कार्य करते. स्वदेस फाऊंडेशन चे कार्य सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत सुरू असून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांत फाऊंडेशन चे कार्य केंद्रित आहे. यावेळी, एसबीआय सिक्युरिटीज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ दीपक कुमार लल्ला म्हणाले, “एसबीआय सिक्युरिटीजमध्ये आम्ही व्यक्तींना शिक्षणाद्वारे त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम बनविण्यावर विश्वास ठेवतो. स्वदेस फाऊंडेशनसोबत भागीदारी केल्याबद्दल आणि ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात योगदान दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही आमच्या CSR उपक्रमांद्वारे अधिक समावेशक आणि न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आणि समर्पित आहोत. "मास स्कॉलरशिप प्रोग्राम पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक प्रवाहात इयत्ता 11 आणि 12 पूर्ण करण्यास समर्थन देतो. 300 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण वर्ग 10 च्या पुढे चालू ठेवण्यास सक्षम केल्याबद्दल आम्ही एसबीआय सिक्युरिटीजचे मनापासून आभारी आहोत, आर्थिक अडचणींमुळे त्यांना बाहेर पडण्याची गरज नाही याची खात्री करुन घेतली. आम्ही पुढील वर्षांमध्ये ही भागीदारी मजबूत करण्यासाठी, ग्रामीण महाराष्ट्रातील आणि त्यापुढील अधिक तरुण मुला-मुलींना मदत करण्यासाठी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग म्हणून उच्च शिक्षणात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत असे स्वदेस फाउंडेशनचे सीईओ मंगेश वांगे म्हणाले.
No comments:
Post a Comment