अस्मिता महिला महाविद्यालयाचे राष्टीय सेवा योजनेचे निवासी शिबीर !
मुंबई, (केतन भोज) : अस्मिता कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय विक्रोळी यांचे राष्टीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबीर भिन्नार, भिवंडी येथे 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 या काळात संपन्न झाले. शिबीराअंतर्गत भिन्नार आश्रमशाळा आणि पंचकोशीतील लोकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन इंडियन मेडिकल असोसियेशन आणि अस्मिता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले. या शिबिराचा 125 लोकांनी लाभ घेतला. शिबिरात आपली सेवा विक्रोळीतील नामवंत डॉ. हरीष पांचाळ, डॉ. जयश्री पांचाळ, यांनी दिली. तसेच भिनार आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि गावकऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ 179 लोकांनी घेतला. शिबिरामध्ये स्वच्छता अभियान, बेटी बचाव ,बेटी पढाव, महिला सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक बंदी या विषयावर पथनाट्य आणि पदयात्रा यांच्या आधारे जनजागृती करण्यात आली. भिन्नार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. चिंचवली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले चिंचवली जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नवनीत अपेक्षित प्रश्नसंच, आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा नायर, उपाध्यक्षा आणि सिग्मा कॉम्प्युटरच्या प्रमुख अस्मिता खोचरे, खजिनदार तृप्ती वाघमारे, संस्थेचे विश्वस्त प्रनील नायर, राहुल वाघधरे संजय रुमडे, संजीवनी रुमडे, अस्मिता महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी .ए .एस. एम. ओझा, पर्यवेक्षिका डॉ. नेहा दळवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि सहकारी प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment