Friday, 13 December 2024

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाची निवड !!

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाची निवड !!

नालासोपारा/ पंकज चव्हाण : शिक्षण विभाग पंचायत समिती वसई तर्फे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत एस. के. सी शाळा आणि महाविद्यालय, नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलेले होते. सदर विज्ञान प्रदर्शनात विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी उच्च प्राथमिक दिव्यांग विभाग( इयत्ता पाचवी ते आठवी) तसेच उच्च माध्यमिक दिव्यांग विभाग इयत्ता (नववी ते बारावी )या दोन्ही गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.

इयत्ता पाचवी ते आठवी या गटासाठी सागरी जलशुद्धीकरण प्रकल्पास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या प्रकल्पात अथक मेहनत करणारे विद्यार्थी कु.स्वरूप भूषण पाटील व कु.पल्लव पराग घरत आहेत.

इयत्ता नववी ते बारावी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा  'टेस्ला कॉइल द्वारे उच्च विद्युत निर्मिती' हा प्रकल्प आहे. सदर प्रकल्पासाठी अथक मेहनत करणारे विद्यार्थी कु. वेदांत संतोष गावठे व कु. हर्ष संजय मालप हे आहेत. 

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री महेंद्र पाटील सर व सर्व विज्ञान शिक्षक या सर्वांचे शाळेच्या सन्मा. मुख्याध्यापिका श्रीम. मुग्धा लेले,  सन्मा. उपमुख्याध्यापिका श्रीम. चित्रा ठाकूर, सन्मा. पर्यवेक्षिका श्रीम. किरण देशमुख  तसेच सहकारी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...