मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे सामाजिक आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित !!
घाटकोपर, (केतन भोज) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख मुख्यमंत्री सचिवलायचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांना मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने सामाजिक आरोग्य दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर असलेले तसेच राज्यभरातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावे यासाठी मंगेश चिवटे यांचे योगदान बघता त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठा उद्योजक लॉबी या सामाजिक संघटनेचा सातवा वर्धापन दिन रविवार दि.१ डिसेंबर रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून, मराठा उद्योजक लॉबीच्या समन्वयातून दुर्धर आजार असलेल्या अनेक गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळाली असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी यावेळी सांगितले. मंगेश चिवटे यांनी मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे आणि उपस्थित सर्व उद्योजकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मंगेश चिवटे यांनी कार्यक्रमाची सांगता होत असताना चार गरजू बांधवांच्या मेडिकल केसेस हाती घेतल्या आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहकार्य करण्याचा शब्द यावेळी दिला. यामध्ये ६ ते ८ महिन्याच्या मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया, २२ वर्षाच्या मुलाचे हृदय ट्रान्सप्लांट, कार्यक्रम स्थळी आलेल्या पत्रकार भगिनीच्या वडिलांचे ट्रीटमेंट तसेच या कार्यक्रमाच्या सोशल मीडिया लाईव्ह मध्ये आलेल्या कमेंट मधील लहान मुलीच्या ब्रेन ट्यूमर च्या शस्त्रक्रियेसाठी केईएम मध्ये सहकार्य करणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. या वर्धापन कार्यक्रमस्थळी ही मंगेश चिवटे यांच्या रुग्ण सेवेचं अविरत कार्य सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.
वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तिमहत्त्व मंगेश चिवटे सामाजिक आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर त्यांच्यावर विविध सामाजिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment