शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याध्यक्ष पदी रामहरी राऊत तर सचिव पदी प्रथमेश पाटील, माऊली धुळगंडे यांची नियुक्ती !!
मुंबई, (केतन भोज) : राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, या कक्षाचे मूळ संकल्पना तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याध्यक्ष पदी रामहरी राऊत तर सचिव पदी प्रथमेश पाटील आणि माऊली धुळगंडे यांची नियुक्ती केली आहे. गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हाये याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, तसेच अनेक ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचे काम वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून केले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मदत केली जाते, यातून अनेक गोरगरीब जनतेला याचा फायदा झाला आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब आणि गरजवंत, आर्थिक दुर्लभ घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव बेड उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत करणे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात येते.
No comments:
Post a Comment