मा.दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे (रजि.)निर्मित लोकप्रिय नमन !!
** श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे कोकणच्या नमन लोककलेचे आयोजन
मुंबई - (दिपक कारकर/शांताराम गुडेकर) :
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विविध लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोध करत जनजागृती करण्याचे महान कार्य अनेक लोकशाहीर, लोककलावंतांनी केला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला गौरवशाली सांस्कृतिक - परंपरा कायम आहे. महाराष्ट्रातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या असताना कोकणात अनेक गाव-वाडी कुशीत काही लोककला फक्त सणासुदीलाच सादरीकरण होत असून त्या मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत यासाठी कोकणातील बरेच लोक आपआपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. त्यापैकीचं एक कोकणात नावलौकिक मिळवलेले मु.पो.फणसवळे ता.जि. रत्नागिरी मधील श्री हनुमान भक्त सेवा मंडळ (रजि.) होय. उपरोक्त मंडळाच्या वतीने कोकणातील बहुप्रिय लोककला नमन कलेचा या मोसमातील शुभारंभाचा प्रयोग मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४, रात्रौ ८ः ३० वा. मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, (पूर्व) मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरुष-पात्राने सादरीकरण होत असलेल्या या नमननाट्य प्रयोगातून पौराणिक कथेवर आधारित गण- गरुडाचे गर्व हरण त्याचबरोबर सुरेल संगीत, रंगतदार गाणी, साज शृंगारमय पुरुष पात्रांनी सजलेल्या गवळणींचा नृत्यविष्कार, राधा- कृष्णाची रासलीला सोबत, सतीश रामचंद्र जोशी लिखित/दिग्दर्शित "हवेली एक रहस्य" ही एक दर्जेदार अशी नाट्यकलाकृती सादरीकरण होणार असून कुटुंबासमवेत आवर्जून पाहण्यायोग्य हा कार्यक्रम अगदी रसिकांत उत्सुकता लागून राहिली आहे. खास आकर्षण फणसवळे गावचा भूमिपुत्र, लालबाग- परळचा रिलस्टार प्रथमेश पवार देखील सदर नमन प्रयोगातून आगळी भूमिका साकारताना दिसणार आहे.नमन मंडळाचे लेखक-सतीश रा. जोशी, वगनाट्य दिग्दर्शक- संदीप कानसे / सतीश रा. जोशी, नृत्यदिग्दर्शिका- तेजल पवार-गोताड, गीतरचना-सतीश रामचंद्र जोशी/युवराज जोशी, पार्श्वगायक सतीश रामचंद्र जोशी/ शाहीर रवी भेरे / प्रशांत पडवळ /सुजय माने / युवराज जोशी पार्श्वगायिका-तेजल पवार- गोताड, कीबोर्ड - संदेश आंबेकर / संदेश गोताड, ढोलकी/मृदुंग- प्रभाकर मारकर, ऑक्टोपॅड-कुंदन साळवी, पार्श्वसंगीत- योगेश बांद्रे / अविनाश गोसावी, रंगभूषा रमाकांत घाणेकर, वेशभूषा-सुभाष जोशी, नेपथ्य-सतीश रामचंद्र जोशी व श्री हनुमान भक्त सेवा मंडळाचे यशस्वी कलावंत यांच्या अथक परिश्रम पूर्वक निर्मितीतून साकारलेल्या ह्या नमन प्रयोगाला कोकणवासीय मुंबईकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी दिपक कारकर- ९९३०५८५१५३, रमेश भेकरे-९५९४३५२८६३, संतोष घाणेकर- ९८३३६८९६४२, रमेश कोकमकर - ८८५०४२२७११ यांच्याशी संपर्क साधवा.
No comments:
Post a Comment