ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे यांच्या वतीने दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा संपन्न.
मुंबई - निलेश कोकमकर
चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा गावातील ग्रामस्थांनी आणि मुबंई- पुणे सारख्या शहरातील होतकरू तरुणांनी स्थापन केलेल्या ग्राम विकास मंडळ ताम्हणमळा मुंबई - पुणे ह्या मंडळा मार्फत दरवर्षी अनेक शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक काम निःस्वार्थीपणे करण्यात येते. त्याच बरोबर दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत गावातील रहिवाशी - तरुण - तरुणी यांना एकत्रित करण्यास प्रयत्न करत आहे. प्रतिवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यातीलच एक उपक्रम म्हणजेच दिनदर्शिका- २०२५चा प्रकाशन सोहळा दादर येथे मान्यवर, ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे सदस्य, जाहिरातदार, हितचिंतक आणि देणगीदार यांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला..
दिनदर्शिका प्रकाशन युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रुग्ण सामाजिक संस्थेंचे अध्यक्ष मा. अमोल सावंत साहेब, सचिन धुरी , प्रकाश वरेकर, प्रविण जड्याळ, निलेश कोकमकर (पत्रकार समाजसेवक), विवेक आगरे, बारकू बेंडल, काशिनाथ घोरपडे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.. यावेळी मंडळाचे अध्यक्ष - उदय कदम, सचिव - रणजित वरवटकर, उपाध्यक्ष - नागेश खरात, खजिनदार- संकेत आगरे, विजय शिगवण, सदस्य - विकास कदम, अनिल भुवड, प्रथमेश कदम,गजानन तांबडे, मंगेश तांबे, महेश आखाडे, संचित गोरे, सुभाष आखाडे, हर्षद खरात, सूरज आगरे,वैभव खरात, वैभव गुरव उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शाळेला भेट वस्तू, गावच्या शिमेवर प्रवेश द्वार उभारणी, महिला दिना निमित्त गावातील महिला यांना भेटवस्तू देणे असे गावाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवण्यात येतात.. ह्या दिनदर्शिकेमध्ये गावच्या वाडीप्रमाणे असणाऱ्या कार्यक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे महत्वाचे नंबर यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील रहिवाशी यांना उपयोगी ठरणारी परिपूर्ण ही दिनदर्शिका आहे ह्यांची पूर्ण माहिती देऊन आणि उपस्थितांचे आभार मंडळाचे सचिव रणजित वरवटकर मानून सोहळ्याची सांगता साली
No comments:
Post a Comment