धर्मासागर उपासना केंद्र श्रीसिध्देश्वर मित्र मंडळातर्फे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन !
मुंबई, (केतन भोज) : जय जवान क्रिडा मंडळाचे मैदान राम नगर(ब), सुजाता हॉटेलच्या वरील बाजूस, विक्रोळी पार्कसाईट, घाटकोपर (प.) मुंबई या ठिकाणी परमपुज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसेबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या धर्मासागर उपासना केंद्राच्या नवव्या वर्षपुर्ती निमित्त मार्गशीर्ष कृ.१२/१३/१४ शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०२४ ते रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ या कालावधीत भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ तद्नंतर रात्रौ ७.३० ते ९.३० हरिकिर्तन असा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दैनंदिन कार्यक्रमांसोबतच तीन दिवसांच्या या कालावधीमध्ये दि.२७ डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी १० वाजता ओम आदिनाथ विश्वेश्वर मंदिर ते कार्यक्रम स्थळ अशा प्रकारे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ३ ते ४ या वेळेत महाधर्मासागर उपासना, सायं. ७.३०ते ९.३० या दरम्यान ह.भ.प. कबीर म्हाराज अत्तार (राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते,झी टॉकीज मन मंदिरा फेम) यांचे हरिकीर्तन. तर दुसऱ्या दिवशी शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला असून सायं ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले (विनोदाचार्य, परभणी) यांचे हरिकीर्तन आयोजित केले आहे. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ज्ञानेश्र्वरी पारायण आणि दुपारी १२ वाजता गुरुपूजन, सायं ४ ते ५ या वेळेत दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा असून, नंतर सायंकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० यावेळेत ह.भ.प. गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसेबाबा (संस्थापक : स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. अशा विविध प्रकारच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन धर्मासागर उपासना केंद्र श्रीसिद्धेश्वर मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त अध्यात्मिक सेवेकऱ्यांनी सहभागी होऊन अध्यात्मिक सेवेचा व ज्ञानाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भेकरे व उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.
राम कृष्ण हरि..!! जय धर्मासागर
ReplyDelete