Friday, 20 December 2024

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात "बहुरंगी भारूड" लोककलेच्या प्रयोगाचे टिम सचिन चाहते परिवार मुंबई तर्फे आयोजन !

दादरच्या छत्रपती  शिवाजी महाराज नाट्यगृहात "बहुरंगी भारूड" लोककलेच्या प्रयोगाचे टिम सचिन चाहते परिवार मुंबई तर्फे आयोजन !

मुंबई - (शांताराम गुडेकर/दिपक कारकर) 

              कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे-खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातील या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत. मग भजन, जाखडी नृत्य, भारुड असो किंवा नमन या कलेवर जिवापाड प्रेम करणारे रसिक नेहमीच या कलेचा आनंद लुटायला आतुर झालेले असतात.
             कोकणची पारंपारिक लोककला म्हणून "नमन" या कलेकडे पाहिले जाते. शिमगोत्सवात कोकणात बहुतांशी गावातल्या प्रत्येक वाडीत नमनाचा सुर चांगलाच गवसलेला असतो. श्री गणपती आराधना ( गण ) गवळण, पारंपारिक सोंगे, सामाजिक किंवा प्रबोधनाचा संदेश देणारी नाट्यकृती "फार्स" तर सोबत काल्पनिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित वगनाट्य सादर केले जाते. ढोलकी, मृदुंग, टाळ ही पारंपरिक वाद्य आणि विविध चालबद्ध गाणी यांचा मेळ नमनात असतो. नमन या लोककलेत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची ही  नमन लोककला वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.

            लोककलेच्या कलावंताना जन्म देणारी ही कोकणभूमी आणि ही कोकणभूमी म्हणजेच पृथ्वीवरचा स्वर्ग होय. योगायोग म्हणावा की, साक्षात परमेश्वराने घडवून आणलेली अनोखी भेट हेच उमगत नाही कारण, मैत्री कुठे आणि कधी होईल याची वेळ निश्चित नसते हे अगदी खरं आहे आणि या  निखळ मैत्रीचे तुम्ही - आम्ही साक्षीदार आहोत. आमच्याशी जीवापाड मैत्रीचा मानबिंदू असे सर्वांचे लाडके नामवंत कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, शाहीर सचिन धुमक (ढाकमोली, चिपळूण) यांच्या संकल्पनेतून टिम सचिन चाहते परिवाराची निर्मिती करुन कोकण क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढावा आणि त्यातून मिळणारी थोडी -थोडकी रक्कम ही नवोदित कलाकारांसाठी खर्च करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत क्रिकेट स्पर्धेची तब्बल तीन पर्व यशस्वीपणे पूर्ण करण्याचा बहुमान यांनी मिळवला आहे.
             कोकणभूमीतल्या नवोदीत कलाकारांना उत्तम रंगमंचावर आपल्या अभिनयाची छाप पाडता यावी त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत ,किर्तीवंत कलाकारांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीरातून हाती लागलेल्या हिऱ्यांना चकाकी देण्याचे काम सुरु केले आणि थेट बहुरंगी भारुडाची संकल्पना नवोदित कलाकारांसमोर ठेवली होती आणि याच कलाकारांना हाताशी धरुन ऐतिहासीक वगनाट्य इतिहासाच्या पानावरील अपरिचित योध्दा रामजी पांगेरा यांची अजरामर कहानी आपण सर्वांनी पाहीलीच आहे. तसेच स्वत: रामजी पांगेरा ही भूमिका साकारुन रसिकांना निःशब्द करणारा अवलिया म्हणजे शाहीर सचिन धुमक होय.
            नव्या वर्षात नवी अदाकारी, नवे ऐतिहासिक वगनाट्य "गर्जती तोफांचे चौघडे" मोठ्या रुबाबात सादर होणार आहे तर रसिकजनहो आपण नक्की यावे. चाहत्यांचे.....बहुरंगी भारुड...! याचे आयोजक  टिम सचिन चाहते परिवार मुंबई असून दिनांक :- ०४ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ०७:३० वाजता दादर पश्चिम येथील  छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (दादर) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. तिकीट किंवा अधिक माहितीसाठी ९०८२४ ८९६६३ या नंबरवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...