कुणबी युवा मंच मुंबई, (रजि). तालुका - माणगाव सामाजिक संघटना अंतर्गत कुणबी युवती महीला सामाजिक संघटना (मुंबई) तर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न !
मुंबई - ( शांताराम गुडेकर /दिपक कारकर )
कुणबी युवा मंच मुंबई, (रजि). तालुका - माणगाव सामाजिक संघटना अंतर्गत कुणबी युवती महीला सामाजिक संघटना (मुंबई) याच्या माध्यमातून रविवार दि.२९/१२/२०२४ रोजी भव्य दिव्य दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. हा सोहळा श्री.ज्ञानेश्वर खराडे यांच्या अध्यक्षतेखाली गुजराती सेवा मंडळ माटुंगा, येथे आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमात कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव पदाधिकारी श्री.ज्ञानेश्वर खराडे - अध्यक्ष, श्री. दत्तगुरू उभारे - उपाध्यक्ष,श्री. सुनिल माठल - उपाध्यक्ष, श्री.सत्यजित भोनकर - सचिव, श्री.नारायण शिंदे - खजिनदार, श्री.काशिनाथ शिंदे - सहसचिव, श्री.विनायक म्हस्के -सहखजिंदार, श्री.नरेश भोसले - सहखजिंदर,श्री.संतोष उंडरे - संपर्कप्रमुख, श्री.राजेश शिर्के - संपर्कप्रमुख, श्री.संतोष उभारे -संपर्कप्रमुख, श्री.श्रीधर भोईर - सल्लागार/स्टारप्रचारक, श्री.राजेश शिर्के (ह) - सल्लागार,श्री.मधुकर टेंबे - सल्लागार, श्री चंद्रकांत टेंबे - सदस्य,१६) श्री. श्रीराम जुमारे - सदस्य, श्री.वैभव शिंदे - सदस्य, श्री. किरण शिगवण - सदस्य, श्री. रुपेश वाढवल - सदस्य तसेच महीला संघटनाच्या सौ. रूपेक्षा भोस्तेकर - अध्यक्षा, सौ अस्मिता शिंदे - उपाध्यक्षा, सौ.सलोनी पाटेकर - सहसचिव, सौ. स्वप्नाली शिंदे - संघटक, सौ.स्वरूपा भोईर - संपर्कप्रमुख, सौ.कल्पना खराडे -संपर्कप्रमुख, सौ दिपाली शिर्के - सल्लागार, सौ. विशाखा तेटगुरे -सदस्य, समीक्षा दळवी - सदस्य, सौ. चेतना तेटगुरे -सदस्य, सौ.बेबी सुरेश टेंबे - सदस्य आणि माणगाव तालुक्यातील अनेक समाज बांधव उपस्थित होते.
समाजातील प्रतिष्ठीत मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव संघटनेचे पदाधिकारी यांनी उत्तम नियोजन केले होते. कार्यक्रम सूत्रसंचालन संघटनेचे सचिव श्री. सत्यजीत भोनकर यांनी उत्तम रित्ता पार पाडले. त्यांनी आलेल्या सर्व समाज बांधव व प्रतिष्ठीत मान्यवर यांचे शाब्दिक स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करून पुढे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. श्री.वैभव शिंदे यांनी या कार्यक्रमाची प्रस्ताविका उत्तम रित्या मांडली. त्यांनी या दिनदर्शिका प्रकाशन करण्यामागचे उद्दिष्ट काय हे छान समजावून सांगितले. मंचाचे कार्य काय आहे हे सुध्दा छान पद्धतीने सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. मंचाचे उपाध्यक्ष श्री.दत्तगुरु उभारे व मंच अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर खराडे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य यांची सविस्तर माहिती दिली. शेवटी या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंच सचिव श्री. सत्यजीत भोनकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सांगता केली.
No comments:
Post a Comment