Monday, 6 January 2025

१७ जानेवारी रोजी आपलं प्रतिष्ठानचा *हळदी कुंकू समारंभ* आणि *भोंदू बाबा , साधू- महाराज यांच्याकडून होणारे महिलांचे शोषण* ह्या विषयावर मार्गदर्शन !

१७ जानेवारी रोजी आपलं प्रतिष्ठानचा *हळदी कुंकू समारंभ* आणि *भोंदू बाबा , साधू- महाराज यांच्याकडून होणारे महिलांचे शोषण* ह्या विषयावर मार्गदर्शन !

** तसेच'लकी ड्रॉ'_

कल्याण- येथील आपलं प्रतिष्ठान या संघटनेच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे "हळदीकुंकू समारंभ" आयोजित करण्यात आला असून "भोंदू बाबा ,साधू - महाराज यांच्याकडून महिलांचे शोषण" होऊ नये म्हणून  मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कल्याण पश्चिम येथील महापालिका मुख्यालय समोरील स्वामी नारायण हॉल येथे मंगळवार सोळा जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सदर कार्यक्रम होणार आहेत. सध्याच्या काळात  भोंदू बाबा, साधू - महाराज यांचे पीक आले आहे. आपण कुणीतरी सिद्ध पुरुष आहोत असे भासवून हे भोंदू बाबा, साधू - महाराज महिलांच्या भोळया, श्रद्धाळू आणि धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत असतात. लैंगिक शोषणही करत असतात. एखादी महिला जाळ्यात सापडली तर तिची सुटका होणे अवघड होते. महिलांवर अशी परिस्थिती ओढावू नये, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होवू नये, त्या सावध रहाव्यात म्हणून  मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आले असून दरवर्षा प्रमाणे लकी ड्रॉ चे देखिल आयोजन केले असल्याची  माहिती आपलं प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

"सह्याद्रीचा प्रतिकैलास श्री क्षेत्र मार्लेश्वर"

"सह्याद्रीचा प्रतिकैलास श्री क्षेत्र मार्लेश्वर" मार्लेश्वर देवालय (मठ)आंगवली व मारळचे श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येथे यात्र...