Friday, 6 June 2025

शिवकृपा कंपनी बंद झाल्यास स्थानिकांचा रोजगार अडचणीत !!

शिवकृपा कंपनी बंद झाल्यास स्थानिकांचा रोजगार अडचणीत !!

* सर्व नियमांचे पालन करून कंपनी सुरू ठेवावी हा खासदार व आमदारांची भूमिका

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील तोरणे गावात 2008 पासून कार्यरत असलेली शिवकृपा अलाईज कंपनी ही गेल्या १७ वर्षांपासून स्थानिक नागरिकांना सातत्याने व स्थिर रोजगार उपलब्ध करून देणारी एक जबाबदार औद्योगिक संस्था आहे. या कालावधीत कंपनीने संबंधित सर्व शासकीय परवानग्या, ग्रामपंचायतीचे NOC आणि पर्यावरणविषयक मान्यताही वेळोवेळी प्राप्त केल्या आहेत.

ग्रामपंचायतीने २००८ साली कंपनीस NOC प्रदान केली होती, त्याच ग्रामस्थांनी आजवर कंपनीकडून विविध स्वरूपातील सेवा शुल्क, कामाचे मोबदले आणि इतर आर्थिक व्यवहार स्वीकारलेले आहेत, याचे अधिकृत दस्तऐवज कंपनीकडे सादर करण्यात आले आहेत.

अलीकडील काही दिवसांपासून काही व्यक्तींनी कंपनीविरोधात प्रदूषण आणि इतर कारणांवरून अर्ज करून कंपनीच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिणामी, कंपनीच्या नियमित कामकाजावर व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार  दौलतजी दरोडा व आमदार शांताराम मोरे यांनी सदर कंपनी सुरू राहावी व स्थानिकांचा रोजगार सुरळीत राहावा, यासाठी प्रशासनाला पत्र दिली आहेत.

खासदार व आमदारांनी परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन स्पष्टपणे सांगितले की – "स्थानिक रोजगार बंद होणे योग्य नाही. सर्व नियमांचे पालन करून कंपनी सुरू राहावी, ही भूमिका घेतली आहे.

शिवकृपा अलाईज कंपनी ही रोजगारनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, ती कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कार्य करत नाही. त्यामुळे ही कंपनी सुरळीत राहावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...