वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा !!
* 'स्वदेशी विचार' व 'नागरिक कर्तव्य' यांचा जागर
वाडा / प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक संस्था वाडा येथे प्रेरणादायी वातावरणात "शिवराज्याभिषेक दिन विशेष कार्यक्रम" पार पडला. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा संकल्पनेतून पार पडलेल्या सदर कार्यक्रमाचे देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ऑनलाईन प्रक्रियेद्वारे उद्घाटन करून त्यांनी दिलेला संदेश तसेच विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांचा संदेश सर्व उपस्थित लोकांना ऐकविण्यात आला.
या कार्यक्रमात मनीष देहेरकर यांनी "स्वदेशी विचारांचा स्वीकार" या विषयावर तर शिव व्याख्याते स्वप्नील पाटील यांनी "नागरी कर्तव्य व शिष्टाचार" या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उद्योजक मिलिंद वाडेकर, विक्रांत काळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गट निर्देशक प्रिती वाणी तर सूत्रसंचालन श्री. सोनवणे यांनी केले.
No comments:
Post a Comment