Sunday, 3 August 2025

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेतर्फे मारा नाथा हार्वेस्ट मिशन अनाथाश्रमात मुलींच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयेचा धनादेश देऊन मदत !!

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेतर्फे मारा नाथा हार्वेस्ट मिशन अनाथाश्रमात मुलींच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयेचा धनादेश देऊन मदत !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार दि.३ ऑगस्ट) रोजी सकाळी चेंबूर येथे मारा नाथा हार्वेस्ट मिशन अनाथाश्रम या आश्रमातील मुलींच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार पाचशे पंचावन्न (रु. २५५५५/-) रुपयेचा धनादेश देऊन मदत देण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष श्री.यशवंत खोपकर, सचिव श्री संदीप चांदिवडे,संचालक श्री.वसंत घडशी, हिशोब तपासणी श्री.दौलत बेलेकर, सदस्य श्री.संतोष चांदे, राजेंद्र पेडणेकर आणि आश्रमाचे संचालक सॅम वेल नैनया, प्रियंका सॅम वेल, विजयकुमार, अ कशाला विजयकुमार आदि मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित धनादेश देण्यात आला.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...