Monday, 4 August 2025

बदलापूरमध्ये मराठी पत्रकारावर जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकाराला दुखापत !!

बदलापूरमध्ये मराठी पत्रकारावर जीवघेणा हल्ला;  मारहाणीत पत्रकाराला  दुखापत !!
 
कमाल शेख -बदलापूर, व्हॉईस ऑफ मिडिया ठाणे जिल्हा‌ खजिनदार, दै.महासागर प्रतिनिधी,

बदलापूर, दि.०४, प्रतिनिधी

बदलापूरमधील मराठी पत्रकार कमाल शेख यांच्यावर हल्लेखोरानी केलेल्या मारहाणीत त्यांना दुखापत झाली. या हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता वर्गात, पत्रकार संघटनेच्या‌ वतीने संताप व्यक्त होत आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच झालेला आघात आहे, अशा तीव्र स्वरूपात समस्त पत्रकारांकडून भावना व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पत्रकार कमाल शेख यांचे कुटुंब भयभीत झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व परिसरातील मच्छी मार्केट मध्ये ही धक्कादायक घटना घडली. बदलापूरमध्ये मराठी पत्रकार कमाल शेख हे दि.०३/०८/२०२५ रोजी दुपारी ०१:३० च्या सुमारास बदलापूर पूर्व परिसरातील मच्छी मार्केट मध्ये स्थानिक मच्छीविक्रीते यांच्या व्यवसायावर बाधा येत असल्याने अशा आशयाच्या बातमीच्या कामी, वृत्तांकन करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी गुंड प्रवृत्तीचा अजय हरी शेट्टी या इसमाने पत्रकार कमाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि कानाला अंतर्गत दुखापत झाली आहे. डोक्याला अंतर्गत दुखापत झाली असल्याने डोक्याचे, कानाचे वैद्यकीय सल्ल्याने पुढील उपचार सुरु आहेत.या घटनेचा समस्त पत्रकार क्षेत्रात संतापाचे वातावरण आहे.

या घटनेमुळे पत्रकार क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे. पत्रकारांकडून, पत्रकार संघटनांकडून घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. ॲड.अनिल भास्कर भोळे (सर्वोच्च न्यायालयाचे कायदेशीर सल्लागार), तसेच व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना, निर्भीड पत्रकार संघटना यांच्यासह अनेकांकडून निषेध व्यक्त होत आहे. पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा आणि हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

 *काय होती बातमी* 

स्थानिक नगरसेवक तसेच गुंडप्रवत्तीचे व्यक्ती या शहरातील वार्डात तसेच चौका-चौकातील फुटपाथवर शहराच्या बाहेरुन आलेल्या परप्रांतीय मच्छी विक्रीत्यांना व्यवसाय करण्यास जागा देवुन त्यांच्याकडुन हफ्ते वसुल करून सदर व्यवसाय करणेबाबत त्यांना संरक्षण देत असल्याने स्थानिक मच्छी विक्रीते यांच्या व्यवसायावर बाधा येत आहे. अशा आशयाच्या बातमीच्या वृत्तांकनकामी ते संदर्भाने बातमीसाठी बदलापूर पूर्व परिसरात स्टेशन लगत असलेल्या मच्छीमार्केटमध्ये गेले होते. त्याचवेळी तेथे अजय हरी शेट्टी या इसमाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. धमकी वजा शब्दामध्ये अर्वाच्य भाषेत  शिवीगाळी केली व त्यांना मारहाण केली. डोक्याला कानाला अंतर्गत दुखापत झाली.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...