Monday, 4 August 2025

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी !!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी !!

कळवा, २ ऑगस्ट : पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे " असे निर्भीडपणे ठणकावून सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्ताने अष्टविनायक मित्र मंडळा तर्फे चिंतामणी सोसायटी येथे साजरी करण्यात आले.  

अण्णाभाऊ नी आपल्या जीवनात कष्ट करून कुटुंबाच्या भार असताना देखील त्यांनी फक्त दिड दिवसाची शाळा शिकून अनेकांना आपल्या लेखणीतून, काव्यातून, पोवाड्यातून अनेकांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रशियात पहिला पोवाडा अण्णांनी गायला त्यात जगभरात त्यांची ख्याती आपल्याला दिसते. कार्यक्रमाचे आयोजन मंगेश पाटोळे यांनी केले होते.

भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है !" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हणले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.

त्यांनी म्हणले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.

त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होते. तसेच प्रमुख मान्यवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती ठाणे जिल्हा सकल मातंग समाज अध्यक्ष मा. श्री दिपक आवारे आणि सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाचे कार्याध्यक्ष ठाणे शहर मा. श्री. प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस श. प . ठाणे शहर जिल्हा प्रवक्ते समीर नेटके, अनिल मोहिते, समाजसेवक माणिकराव शिंदे, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, माजी नगरसेवक मा. श्री राजाभाऊ गवारी, मुबारक शेख, भाजपा कळवा मंडळ अध्यक्ष तेजस चंद्रमोरे, सामाजिक कार्यकर्ता अजय भोसले तसेच अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित मंडलिक, प्रशांत मांजरेकर, अक्षय भोसले, निलेश पाटोळे मंगेश गुप्ता, राकेश बनसोडे, अरविंद रणशिंगे, महावीर सावंत, अभिषेक रणशिंगे, सल्लागार सर्जेराव रणशिंगे, आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...