Friday, 17 October 2025

मे. लॅबगार्ड कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड !

मे. लॅबगार्ड कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड !

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल, कामगारांना दहा हजार रुपये पगारवाढ

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यातील 
पेण येथील लॅबगार्ड कंपनीतील कामगारांसाठी न्यू मेरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटने मार्फत हा ३ रा पगारवाढीचा करार करण्यात आला. दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संघटनेच्या पनवेल कार्यालयात हा करार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक परिषदेसाठी सध्या ब्राझिल (साऊथ अमेरिका) येथे आहेत परंतू कामगारांना मिळणारे फायदे थांबू नये म्हणून आपल्या अनुपस्थीतीत संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना करारावर सही करण्याचे अधिकार त्यांनी दिल्यामुळे आज हा करार होवुन त्याचा फायदा कामगारांना होवू शकला .

या करारनाम्यानुसार कामगारांना १०,००० रुपये पगारवाढ, १२.५% बोनस, मेडीक्लेम, पिकनिक, रजांमधे वाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारनाम्यानुसार पगारवाढीच्या फरकाची रक्कम कामगारांना दिपावली सणापूर्वी अदा करण्यात येणार आहे त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. या करारनाम्या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के.रमण, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर अजय कणेकर, प्रोडक्शन मॅनेजर राहुल जोगत तसेच कामगार प्रतिनिधी हरेश पाटील, सुरेश दळवी, प्रमोद पाटील. रोहन कडव, प्रदिप धनावडे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. दिपावलीच्या पूर्वसंधेला झालेल्या पगारवाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...