Wednesday, 19 November 2025

नागरी संरक्षण दलाकडून अंबरनाथ येथे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण सुरू !!!

नागरी संरक्षण दलाकडून अंबरनाथ येथे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण सुरू !!!

अंबरनाथ, जि. ठाणे - प्रतिनिधी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :
देशातील नागरिकांचे संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा देण्यासाठी स्वयंसेवक तयार करण्याच्या दिशेने नागरी संरक्षण दलाचे महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू आहेत. मा. संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार व उपनियंञक, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली Capacity Building of CD Volunteer Course No. 09/2025 या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास अंबरनाथ येथे आजपासून प्रारंभ झाला.

हा प्रशिक्षण उपक्रम दि. १८/११/२०२५ ते २४/११/२०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. १७.४५ या वेळेत आयोजित करण्यात आला असून एकूण ३० स्वयंसेवक या कोर्समध्ये सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी नागरी संरक्षणाची गरज, त्याचे सामाजिक महत्त्व आणि स्वयंसेवकांची जबाबदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार श्री. अनिल गावित (सउनि) यांनी नागरी संरक्षणाची ओळख, प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच मास्टर ट्रेनर डॉ. घाटवळ यांनी विविध आपत्तीस्थितीत कसे प्रतिसाद द्यावे याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

नागरी संरक्षण दलाचे हे प्रशिक्षण केवळ सैद्धांतिक नसून स्वयंसेवक प्रत्यक्ष परिस्थितीत कार्यक्षम कसे ठरतील यावर केंद्रित आहे. आपत्तीच्या वेळी जनतेला सुरक्षित स्थळी हलविणे, प्राथमिक उपचार, शोध-बचाव कार्य, अग्निसुरक्षा, संप्रेषण व्यवस्था आणि समन्वय कौशल्य यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी या कोर्समध्ये शिकविण्यात येतात.

नागरी संरक्षण दल, ठाणे यांच्या माहितीनुसार,
"देशातील नागरिकांचे प्राण आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक तयार करणे ही काळाची गरज आहे आणि नागरी संरक्षण दल हे कार्य सातत्याने व निष्ठेने पार पाडत आहे."

     *आगामी काळात नागरी संरक्षण प्रशिक्षण हाॅल, अंबरनाथ (प.) जि.ठाणे येथे Capacity Building of CD Volunteers Course No. 10, 11 & 12/2025 चे आयोजन करण्यांत येणार आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करुन आपली क्षमता तपासावी, असे आवाहन नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे यांचेकडुन करण्यांत येत आहे.*
💐👍👏👍💐

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...