Tuesday, 18 November 2025

ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री सुदाम पाटील यांना पितृशोक !!

ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री सुदाम पाटील यांना पितृशोक !!

कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री सुदाम पाटील यांचे वडील कै.धर्मा भाऊ चौधरी (पाटील) यांचे वृद्धापकालाने सोमवार दिनांक १७/११/२०२५ रोजी ७:४५ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली सुदाम पाटील चौधरी यांचा रुंदे गावात मोठा परिवार असून कल्याण तालुक्यात समाजसेवक म्हणून या परिवाराचे नाव आहे त्यात समाजसेवेचा एक नाव म्हणून त्यांचे वडील कै. धर्मा भाऊ चौधरी (पाटील) हे देखील समाजसेवक होते रुंदे काळू नदीवर जवळ जवळ ५० वर्ष त्यांनी नावाडी अर्थात होडीवाला म्हणून जनतेची सेवा केली पैसे असोत या नसोत दिलेल्या होडीचा उतारा ते न बघता खिशात घालायचे कितीही नदीला पूर असता न डगमगता ते जनतेची सेवा करत असत असा चांगला स्वभाव असणारी ही व्यक्ती धर्मा भाऊ चौधरी कल्याण तालुक्यात त्यांना ज्येष्ठ नागरिक तसेच माननीय मंत्री शिवाजी नाईक यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच फळेगाव येथे आदर्श व्यक्ती म्हणून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आमदार पुरस्कार देण्यात आला तसेच चौधरी कुलभूषण पुरस्कार देऊन ही त्यांना सन्मानित केले होते व अनेक संस्थांनी त्यांचा गुणगौरव करण्यात आला होता त्यांच्या नावाप्रमाणे आज सुदाम पाटील हेही समाजसेवेचा वारसा आज रोजी चालवत आहेत तरी अशी ही धर्मा भाऊ चौधरी ( पाटील ) ही व्यक्ती नावाप्रमाणे धर्म सेवेचा धर्म करता करता आज रोजी रुंदे या गावातून व चौधरी (पाटील) परिवारातून निघून गेल्याने गावात व परिसरात शोककला पसरली आहे त्यांच्या अंत्ययात्रा वारकरी संप्रदायाच्या मंडलीने हरिनामाच्या जयघोषात केली त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो संख्येने सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

त्यांची दशक्रिया विधी वार बुधवार दिनांक २६/११/२०२५ रोजी श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर मढ येथे होईल तर उत्तर कार्य म्हणजे तेराव्याचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक २९/११/२०२५ रोजी राहत्या घरी रुंदे येथे होणार आहे याची नोंद घ्यावी व आपल्या नातेवाईकांना कळवावेत.
**********************

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...