Friday, 19 December 2025

नागरी संरक्षण नवीमुंबई समुहांतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!!

नागरी संरक्षण नवीमुंबई समुहांतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!!
    
कल्याण प्रतिनिधी :
नागरी संरक्षण नवीमुंबई समुह, ठाणे अंतर्गत मुलभूत आपत्ती व्यवस्थापन पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.

नागरी संरक्षण नवीमुंबई समुह, ठाणे अंतर्गत मा. श्री. विजय जाधव, उपनियंत्रक (Deputy Controller of Civil Defence) यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार तसेच सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित यांच्या सौजन्यपूर्ण देखरेखीखाली आणि डॉ. किशोर अढळकर यांच्या पुढाकाराने पाच दिवसीय नागरी संरक्षण मुलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. १५/२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण दि. २४ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल सिनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ठाकुर्ली (पूर्व) येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.

या प्रशिक्षणामध्ये डॉ. श्री. राहुल घाटवाल, मान. निदेशक व विभागीय क्षेत्ररक्षक तसेच श्री. धांधा, वरिष्ठ स्वयंसेवक यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.

सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण व त्यांचा सत्कार सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी के. एम. पटेल महाविद्यालय, ठाकुर्ली (पूर्व) येथे मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी मंगेश नंदनवार, विभागप्रमुख सहाय्यक प्रा. कल्पना जाधव, सहाय्यक प्रा. रोहिणी वालावंदे, सहाय्यक प्रा. अंजू पाल, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी करिश्मा विनायक पाटील, क्षेत्र–१ ठाणेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. बिमल नथवाणी, क्षेत्र–३ (उल्हासनगर–अंबरनाथ–बदलापूर) चे उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. कमलेश श्रीवास्तव तसेच नागरी संरक्षण योद्धा डॉ. किशोर अढळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत तत्परता, शिस्तबद्ध कार्यपद्धती व सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...