Wednesday, 24 December 2025

हुतात्म्यांच्या धुतूम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या स्मिता ठाकूर बिनविरोध !

हुतात्म्यांच्या धुतूम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या स्मिता ठाकूर बिनविरोध !

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या धुतूम गाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी (ता. २४) स्मिता नंदकुमार ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली.  यावेळी महेंद्रशेठ म्हणाले, "निवडणूक लढताना दिलेली आश्वासने पूर्ण करा. पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे, पण तो शंभर टक्के सुटला पाहिजे. मैदान आणि समाज मंदिर हे प्रश्न लवकरच सुटतील. महिला लढावू आहेत, त्यांना संधी मिळालीच पाहिजे. धुतूम ग्रामपंचायत आणि सर्वच पदाधिकारी चांगले काम करतायत. त्या सर्वांचे अभिनंदन!"  यावेळी सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर,  आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

 धुतूमचे माजी सरपंच शंकर ठाकूर, उद्योजक पी. जी. शेठ ठाकूर, कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, अखलाख शिलोत्री आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच धुतूमचे नारायण पाटील, राजन कडू, मनोज ठाकूर, राजेश ठाकूर, सुजित ठाकूर, नरेश ठाकूर, दिगंबर ठाकूर, तेजस पाटील, रामचंद्र पाटील, श्याम ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, प्रसाद ठाकूर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...