Wednesday, 24 December 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर यशस्वी !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर यशस्वी !!

बातमीदार कुर्ला (प.) प्रतिनिधी: ता. २४,
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.), मुंबई येथे आज विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सामान्य आरोग्य तपासणी व मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या शिबिरासाठी स्वराज्य सेवाभावी संस्था, करीरोड, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. रमेश शेळके, डॉ. फैजान सिद्दिकी व डॉ. श्री. आदित्य सोनवणे हे नेत्र तपासणीसाठी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ. अंजली तळवळकर मॅडम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वेळात वेळ काढून उपस्थित राहून विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली.

सदर शिबिरात इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ आरोग्य व दृष्टीविषयक समस्या आढळून त्यांना आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर मार्गदर्शन करताना सांगितले की, “शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने रात्र शाळांमध्ये दिवसभर काम करून धावपळीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून घेत आहोत.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर, शिक्षक श्री समाधान खैरनार, श्री योगेश वीरकर सर, श्री ओव्हाल सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रमोद गीते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मासूम संस्थेच्या निकिता पोळ मॅडम याही कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. 

आरोग्य तपासणी शिबिरामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...