नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत वर्षअखेरचा प्राथमिक नागरी संरक्षण प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्साहात संपन्न !!
बातमीदार कल्याण प्रतिनिधी : ता. २४, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत वर्षअखेरीस आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक नागरी संरक्षण पाठ्यक्रम क्र. २८/२०२५ चा समारोप आनंदी व उत्साहात संपन्न झाला.
मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार दि. १८ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत दुपारी १२.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत लाईट हाऊस, स्किलिंग सेंटर, विराट रेसिडेंसी, आंबिवली (प.), ठाणे येथे सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणाच्या पाचव्या व अंतिम दिवशी (दि. २२/१२/२०२५) सहाय्यक उपनियंत्रक श्री. आननसिंग गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्याने तसेच विविध आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रात्यक्षिकांचा सराव व त्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सहभागी सामान्य नागरिकांमधील २७ प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
सांगता समारोप कार्यक्रमास लाईट हाऊसच्या अध्यक्षा मॅडम व सचिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षण संघटनेत भरती होण्याबाबत शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षण काळातील काही निवडक छायाचित्रे माननीय महोदयांच्या माहिती व अवलोकनार्थ सादर करण्यात आली. सदर प्रशिक्षणामुळे आपत्ती व्यवस्थापनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन समाजासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक तयार होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment