कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११/ब मधून आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निलम निलेश व्यवहारे यांनी भरला उमेदवारी अर्ज !!
कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आय आदमी पक्षाने प्रभाग क्रमांक ११/ब मधून निलम निलेश व्यवहारे यांना उमेदवारी देत एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला आहे. आम आदमी पक्षाचे कार्य करत असताना त्यांनी जनतेच्या अनेक प्रश्नांवर काम केले आहे. प्रभागातील कोणतीही समस्या व जनतेच्या अडीअडचणीला निलम व्यवहारे काम करत आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आमचा विजय नक्की असा विश्वास व्यक्त केला.
तसेच जनतेला त्यांनी आवाहन केले की आज आमचा पक्ष स्वच्छ चारित्र्याचा असल्याने आवाहन केले की मी नीलम निलेश व्यवहारे तुम्हा सगळ्यांना विनंती करते की, येत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2025-2026 सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक या पदासाठी उमेदवार म्हणून आम आदमी पार्टी पक्ष तर्फे झाडू या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 11 (ब) म्हणून त्यासाठी आपल्या आशीर्वाद स्वरूपामध्ये आर्थिक देणगी धनराशी आवश्यक आहे. तरी आपण वरील स्कॅनर वर मला मनापासून, खुल्या दिलाने आर्थिक सहकार्य करावे. ही अपेक्षा करते. मी आपली आभारी राहीन. एक रुपया पासून तुमची यथाशक्ती रुपये पाठवला तरी चालेल. पण आशीर्वादाच्या रूपात पाठवा.
आपली साथ हीच आमची ताकद बनत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार निलम निलेश व्यवहारे यांनी सांगितले.
.
.
No comments:
Post a Comment