Sunday, 4 January 2026

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार अनिल भाई निर्मळे यांची प्रचारात जोरदार आघाडी ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार अनिल भाई निर्मळे यांची प्रचारात जोरदार आघाडी ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

घाटकोपर, (केतन भोज) : प्रभाग क्रमांक १२३ चे भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल भाई निर्मळे यांची संपूर्ण प्रभागात आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जोरदार प्रचार फेरी सुरू असून, याला प्रभागातील नागरिकांचा विशेषतः तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद पाठिंबा मिळत आहे.तसेच प्रभाग क्रमांक १२३ मध्ये अनिल भाई निर्मळे यांची प्रचार फेरीत आणि प्रचारात ही जोरदार आघाडी बघायला मिळत आहे. या प्रचार फेरी दरम्यान अनिल भाई निर्मळे हे प्रभागातील नागरिक तसेच प्रभागातील व्यापारी वर्गाशी संवाद साधत प्रभागाच्या विकासाविषयी चर्चा करत आहेत.तसेच यावेळी प्रभागातील स्थानिक नागरिकांनी ही या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनिल भाई निर्मळे यांचे स्वागत केले.

      प्रभाग क्रमांक १२३ चे भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार अनिल भाई निर्मळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १२३ मध्ये विकासाभिमुख,पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १२३ चा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे वेळेत निराकरण आणि सुशासन हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अनिल भाई निर्मळे यांनी सांगितले.

     या प्रचार फेरीत भाजप महायुतीचे उमेदवार अनिल भाई निर्मळे यांच्या सोबत मंडळ अध्यक्ष - संतोष गांजले,शिवसेना समन्वयक - मंगेश मोहिते,भाजप १२३ चे वॉर्ड अध्यक्ष - महेश गुप्ता,प्रभाग क्रमांक १२३ चे शिवसेनेचे शाखाप्रमुख - सुनील सोडा, महिला शाखाप्रमुख - पूजा पवार हे देखील उपस्थित असताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...