उरण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी !!
उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील महिला विकास कक्षा तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.व्ही.गर्जे यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्यक्षात आचरणात कसे आणावेत याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर भूगोल विभाग प्रमुख डॉ. आनंद गायकवाड यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर डॉ. पराग कारूलकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी विद्यार्थिनींसाठी दिलेल्या संदेश याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पी आर कारूलकर यांनी केले व आभार डॉ. कांबळे मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment