निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश ; बिनविरोध विजयी नगरसेवक आयोगाच्या रडारवर !!
कल्याण, प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे १२ दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला १३ दिवस बाकी आहेत. मात्र, या पूर्वीच अनेकांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यात बिनविरोध निवडीच्या या नवीन ट्रेंडवर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. संशयांच्या घेऱ्यात असलेल्या या बिनविरोध निवडींची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील सर्व बिनविरोध निवडीचींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही बिनविरोध उमेदवाराच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांवर दबाव टाकला का? त्यांना आमिष दाखवण्यात आले होते का? विरोधी उमेदवारांना धाक दाखून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यात आले का? असे गैरप्रकार झाले आहेत का, याचा शोध निवडणूक आयोग घेणार आहे
यामध्ये भाजपा ४५, शिवसेना शिंदे गट १९ , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ आणि इतर १ असे एकूण ६७ उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध नगरसेवकांची संख्या बघता विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे विजयी नगरसेवक आता राज्य निवडणूक आयोगाच्या रडारवर असणार आहे
No comments:
Post a Comment