केवळ एकच उमेदवार असलेल्या प्रभागांमध्ये निवडणूक घेण्याबाबत ‘आप’ची राज्य निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागणी !!
कल्याण डोंबिवली दि.३ जानेवारी :
एकीकडे विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने शिवसेना आणि भाजप महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (कल्याण–डोंबिवली) राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे.
ज्या प्रभागांमध्ये केवळ एकच उमेदवार शिल्लक आहे, त्या सर्व प्रभागांमध्ये NOTA (None of the Above) या पर्यायाला काल्पनिक उमेदवाराचा दर्जा देऊन निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. तसेच त्या एकमेव उमेदवाराला जर NOTA पेक्षा कमी मते मिळाली तर संबंधित प्रभागात फेरनिवडणूक घेण्याची मागणीही करण्यात आल्याची माहिती आपचे निवडणूक समिती सल्लागार अॅड. आकाश वेदक यांनी दिली.
तसेच प्रबळ विरोधी राजकीय पक्षांच्या काही प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिवसेना - भाजप युतीच्या 20 उमेदवारांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा प्रभागांमध्ये NOTA च्या माध्यमातून निवडणूक झाल्यास, त्या उमेदवारांबाबत जनतेचे मत नेमके काय आहे, हे स्पष्टपणे समोर येईल असे मत आम आदमी पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी व्यक्त केले.
याबाबत आपने राज्य निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
अॅड धनंजय जोगदंड ॲड. आकाश वेेेदक
( कल्याण जिल्हा अध्यक्ष ) ( सल्लागार, निवडणूक प्रचार समिती )
आप, कल्याण - डोंबिवली आप, कल्याण - डोंबिवली
Ph :९३२३२११३४० Ph : ९९३००१३९२६
No comments:
Post a Comment