Wednesday, 7 January 2026

पोलिस व शिवसैनिकांमुळे घाटकोपर येथे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण !!

पोलिस व शिवसैनिकांमुळे घाटकोपर येथे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            घाटकोपर पूर्व कडील रामेश्वर मंदिर लक्ष्मीनगर शेजारी रहाणाऱ्या रिटा कांबळे (वय -63 वर्ष) या वयोवृद्ध महिला त्यांच्या राहत्या घरी वरच्या माल्यावरून पडून अपघातग्रस्त झाल्या.सदर घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रसाद कामतेकर यांनी वारंवार फोन करुन देखील सरकरी 108 रुग्णवाहीका वेळेवर पोहचू शकली नाही. यांनंतर कामतेकर यांनी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्व्यक प्रकाश वाणी यांना मदती साठी बोलावले. प्रकाश वाणी, शिक्षकेतर सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, शाखाप्रमुख विशाल चावक शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर, लोकेश फेपडे यांना यानी घटना स्थळी धाव घेत पंतनगर पोलिस ठाणेंच्या वपोनि लता सुतार यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्वरित पोलिस वायरलेस मदती करिता पाठवली, वायरलेस गाडी सह एएसआय संजय कदम यांनी त्यांच्या टीम सह घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर शिवसैनिक व स्थानिक महिलांच्या मदतीने राजावाडी रुग्णालय गाठले व सदर महिलेवर योग्य उपचार सुरु करण्यात आले. सदर महिलेचे पोलिस व शिवसैनिकांमुळे प्राण वाचले असे विभागातील जनता बोलत आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...