किरीट सोमैया यांच्या हस्ते भाजप महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन !!
घाटकोपर, (केतन भोज) : मुंबई महानगरपालिका निवडणूक तसेच संघटनात्मक रचनेला बळकटी देण्यासाठी प्रभाग क्रमांक १२३ मधील सुजाता हॉटेल समोरील भाजप महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन किरीट सोमैया यांच्या हस्ते तसेच प्रभाग क्रमांक १२३ चे भाजप महायुतीचे उमेदवार अनिल भाई निर्मळे यांच्या समवेत पार पडले.या जनसंपर्क कार्यालयातून निवडणूक प्रचाराचे नियोजन, मेळावे, सभा, मतदार यादीविषयी मार्गदर्शन तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणा या मध्यवर्ती कार्यालयातून राबवली जाणार आहे.
यावेळी मंडळ अध्यक्ष- संतोष गांजले,१२३ चे भाजप वॉर्ड अध्यक्ष - महेश गुप्ता,१२३ चे शिवसेना शाखाप्रमुख - सुनील सोडा, शिवसेना समन्वयक - मंगेश मोहिते, विधानभा महिला समन्वयक - सुनीता जाधव, श्रीमती जयश्री कांबळे, १२३ च्या शिवसेना महिला शाखाप्रमुख - पूजा मोरे, १२३ वॉर्ड महामंत्री - दिनेश पांडे तसेच अन्य असंख्य भाजप महायुतीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित राहत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.
No comments:
Post a Comment