Tuesday, 6 January 2026

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्ह्याच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी !!

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्ह्याच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी !!

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्ह्याच्या वतीने कामगार भवन बोकडविरा उरण येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी प्रमिला म्हात्रे होत्या, प्रास्ताविक कुंदा पाटील यांनी केले धनवंती भगत यांनी सावित्रीबाई फुले चीं मुलींसाठी पहिली शाळा काढली पण आज सरकारी मराठी शाळा सरकारी धोरणांमुळे बंद पडल्याने मुलीच्या शिक्षणात घट झाली आहे अशी मांडणी केली. कुंदा पाटील यांनी ब्राह्मणशाहीचा सावित्रीबाई फुले नांव त्रास सहन करावा लागला, आजही आपल्या महिला ब्राम्हणशाही ला बळी पडत आहेत असे मत व्यक्त केले.


यावेळी रजनी पाटील ,निराताई घरत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून षुप्षहार अर्पण केला.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा सविता पाटील,गिता पाटील, खजिनदार लता पाटील यांनी सावित्रीबाई फुले चीं ओवी गाऊन सभेला सुरूवात केली.
सभेला कूसुम ठाकूर, किसान सभेचे नेते संजय ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.समारोपाच भाषण हेमलता पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला दिलेला अधिकाराचा उपयोग समाजा मध्ये देशात चाललेल्या राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडीं कडे लक्ष देवून प्रतिकार करण्याची हिम्मत ठेवली पाहिजे,

आता होवून गेलेल्या आणि होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या गैरवापर ,मत चोरी, मत विकत घेणं, मशिन मध्ये घोटाळा करणे आता तर पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आले ही लोकशाहीची हत्याच केली आपण पुढील काळात सतर्क राहिलो तरच आठव्या शतकात सावित्रीबाईं फुलेंचां वारसा पुढे घेवून जाण्यासाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेवू असे आवाहन हेमलता पाटील यांनी केले. अभिवादन सभेत एक पात्री नाटक मी सावित्री बोलते बोकडविरा गावची मुलगी प्रिचित राजेश पाटील हिने सादर केले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील हया होत्या. प्रियेशा राजेश पाटील, उषा म्हात्रे, जयवंती भगत, गुलाब टावरी आदी महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...