Monday, 5 January 2026

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा राज्य पुरस्कार जाहीर !!

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा राज्य पुरस्कार जाहीर !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाला असून मंगळवार दिनांक ६/१/२०२६ पत्रकार दिनानिमित्त बी.आर.दंडवते सभागृह, महाराष्ट्र हायस्कूल शेजारी, ना.म.जोशी मार्ग, करी रोड (प), मुंबई या ठिकाणी सायंकाळी ६ ते १० या वेळेत या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
                 बाळकृष्ण कासार हे गेली चाळीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून लोकनिर्माण मराठी वृत्तपत्र, लोकनिर्माण प्रिंट आणि डिजिटल मिडीया तसेच लोकनिर्माण न्युज चॅनलचे संपादक असून, काही  पत्रकार संघटनेचे आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत.ते महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकार (Accredited Journalist)  आहेत.
                 त्यांना आजवर अनेक संस्थाकडून ४६ राज्य, चार राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले असून दिवाळी अंकाला दोन राज्य पुरस्कार प्राप्त झालेले असून, कोविड १९ या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक संघटनेकडून उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
                लोकनिर्माण च्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संपादक बाळकृष्ण कासार यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...