Thursday, 8 January 2026

महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे पार्कसाईटकरांना आवाहन !!

महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे पार्कसाईटकरांना आवाहन !!

घाटकोपर, (केतन भोज) : प्रभाग क्रमांक १२३ चे भारतीय जनता पार्टी,शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल निर्मळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहिर सभा आमदार राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत विक्रोळी पार्कसाईट, वर्षा नगर याठिकाणी पार पडली. या सभेत रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून नागरिकांना मार्गदर्शन करताना महायुतीच्या उमेदवारांना कमळ या चिन्हांवर मतदान करून प्रभाग क्रमांक १२३ चे महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. महायुतीच स्थिरता, विकास आणि सामाजिक न्यायाची हमी आहे, असा विश्वास यावेळी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. या प्रसंगी या सभेला ओम राम कदम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, कुमार जीत आठवले, चंद्रशेखर कांबळे तसेच माजी नगरसेवक हारून खान यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याठिकाणी या जाहिर सभेला उपस्थित होते. महायुतीच्या या जाहिर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून याठिकाणी महायुतीचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास वाटतो, असे यावेळी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...