महायुतीच्या उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आवाहन !
घाटकोपर, (केतन भोज) : प्रभाग क्रमांक १२७ च्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहिर सभा आमदार राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भिमज्योत सहकार मित्र मंडळ, भीमनगर घाटकोपर पश्चिम याठिकाणी पार पडली. या सभेत रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून नागरिकांना मार्गदर्शन करताना महायुतीच्या उमेदवारांना कमळ या चिन्हांवर मतदान करून प्रभाग क्रमांक १२७ च्या महायुतीच्या उमेदवार सौ.अलका गणेश भगत आणि यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. महायुतीच स्थिरता, विकास आणि सामाजिक न्यायाची हमी आहे, असा विश्वास यावेळी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. या प्रसंगी या सभेला महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याठिकाणी या जाहिर सभेला उपस्थित होते. महायुतीच्या या जाहिर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून याठिकाणी महायुतीचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास वाटतो, असे यावेळी केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment