खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.श्री प्रसाद हौसिंग सोसायटी नागाव रोड उरण येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये महिलांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे जेष्ठ महिलांकडून पूजन करून हळदीकुंकू साजरि केली.या कार्यक्रमास महिलांनी भरभरून मदत कार्य केले.या कार्यक्रमात महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला. जयश्री विशाल महान, पुष्पा सूर्यवंशी, ज्योती चिते,राजश्री मोरे तसेच दुर्गा पाटील, मनीषा मोरे, साधना पाटील,दुर्गा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.भारतीय संस्कृतीत हळदी कुंकू कार्यक्रमाला विशेष महत्व असून या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे सर्वत्र जतन, संवर्धन होत आहे. शिवाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला आपापसातील मतभेद विसरून एक होतात. एकत्र येतात त्या दृष्टीने सामाजिक प्रबोधन, सामाजिक एकता या कार्यक्रमातून सर्वत्र साधला जात आहे.
No comments:
Post a Comment