बालिका स्नेही पंचायत उपक्रमांतर्गत ग्रामीण मुलींची जिल्हाधिकारी कार्यालयास भेट !!
जळगाव- राहुल बैसाणे
शासनाच्या बालिका स्नेही पंचायत या अभिनव मॉडेल उपक्रमांतर्गत उदयनगर (डांगर बु) येथील मुलींनी दि. 16 जानेवारी 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयास शैक्षणिक व प्रेरणादायी भेट दिली.
या भेटीदरम्यान मुलींना मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी मुलींशी संवाद साधत प्रशासन कसे कार्य करते, अधिकारी म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या, शिक्षणाचे महत्त्व आणि आत्मविश्वासाचे स्थान याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भेटीचे नियोजन करून मुलींना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत राज व्यवस्था, ग्रामीण विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग आदी विविध शासकीय विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
हा उपक्रम ग्रामीण भागातील मुलींमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास व प्रशासकीय जाणीव निर्माण करण्यासाठी शासनाचा प्रायोगिक (Model) उपक्रम म्हणून सध्या उदयनगर(डांगर बु) येथे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी मा. बी.डी.ओ. श्री. एन. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामसेविका सौ. सोनी पाटील, सी.आर.पी. भारती पाटील व श्री. मुकेश सोनवणे यांनी सहकार्य केले. यावेळी श्री. राहुल बैसाणे (बाबाजी) यांनी मुलींना स्वीट वाटप करून प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे ग्रामीण मुली मोठी स्वप्ने पाहून ती साकार करू शकतात, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment