Saturday, 17 January 2026

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत प्राथमिक पाठ्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत प्राथमिक पाठ्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!!  

कल्याण प्रतिनिधी : ता. १७, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण, श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शन व निर्देशनुसार दिनांक ०७/०१/२०२६ ते ११/०१/२०२६ या कालावधीत दुपारी १२.०० ते सायं. १६.०० या वेळेत नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रम क्र. ०२/२०२६ चे आयोजन करण्यात आले होते.

सदरचे प्रशिक्षण पाठ्यक्रम मातोश्री काशीबेन मोतीलाल पटेल कला, वाणिज्य महाविद्यालय, ठाकुर्ली (पुर्व), ठाणे येथे सुरू होते. आज दि. ०९/०१/२०२६ रोजी झालेल्या प्रशिक्षण वर्गात एकूण ७५ महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राद्यापक वर्ग उपस्थित होते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण विषयक सैद्धांतिक व्याख्याने तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण देण्यात आले.

मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव सर यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थींना शपथ देत मोलाचे उद्बोधक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. कमलेश श्रीवास्तव (क्षेत्र क्र.३) व उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. करमबिर भुर्जी (क्षेत्र क्र.४) हे सुद्धा उपस्थित होते. तसेच सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग ना. गढरी व उपमुख्य क्षेत्ररक्षक तथा मानसेवी निर्देशक श्री.बिमल नथवाणी यांनी प्रशिक्षणासाठी विशेष सहकार्य केले.

सदर प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची मदत करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असून हा उपक्रम समाजोपयोगी ठरत आहे. प्रशिक्षणाची काही छायाचित्रे माननीय महोदयांच्या माहितीस व अवलोकनार्थ सविनय सादर करण्यात आली.
— उपनियंत्रक
नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...