Sunday, 18 January 2026

मा. देवानंद शांताबाई भूपाल कांबळे यांना राष्ट्रीय भीम ज्योती समाज भूषण पुरस्कार !!

मा. देवानंद शांताबाई भूपाल कांबळे यांना राष्ट्रीय भीम ज्योती समाज भूषण पुरस्कार !!

📰 नागपुरात नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी, विशाल कुरकुटे
नागपूर : नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद, नागपूर यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा विदर्भ हिंदी साहित्यिक मधुरम सभागृह, श्री फतेचंद मोर हिंदी भवन, राणी झाशी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री. सुनील गोडबोले, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते (चित्रपट, मालिका व टीव्ही कलाकार) लाभले. त्यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय भीम ज्योती समाज भूषण पुरस्काराने
मा. देवानंद शांताबाई भूपाल कांबळे (सडोलीकर), सातारा,
मा. श्री. राम रतनजी हाडगे – सुप्रसिद्ध उद्योजक, नागपूर,
उज्वला रोडगे – अभिनेत्री, नागपूर,
मनीषा कांबळे – साहित्यिक, यवतमाळ,
डॉ. रवींद्र दिघोरे – समाजसेवक, नागपूर
यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. प्रा. डॉ. संजय हर्ष होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. बी. एन. खरात, संचालक – समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सौ. स्वाती तरडे, अध्यक्ष – विसावा फाउंडेशन, अर्जुन, तसेच नरेंद्र कुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, फलटण (सातारा), तक्षशील सामाजिक संघटना, राष्ट्रीय सर्व इंडियन पोलीस मित्र भारत यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सन्मानित मान्यवरांचे उपस्थितांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...