केगाव पंचायत समिती सदस्य पदासाठी परीक्षित ठाकूर यांनी निवडणूक लढवावी, जनतेची मागणी !
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक होणार असून केगाव पंचायत समितीसाठी डॅशिंग व आक्रमक व जनतेचे नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
परीक्षित प्रकाश ठाकूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते असून उरण मध्ये पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यात तसेच विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात ते नेहमी अग्रेसर असतात.पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळात, सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते जनतेच्या सतत संपर्कात राहतात. जनतेचे नेहमी विविध प्रश्न सोडवित असतात. आज पर्यंत अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून प्रशासनाचाही त्यांना चांगला अनुभव आहे.परीक्षित ठाकूर यांचे आजोबा शांताराम काशिनाथ ठाकूर हे म्हातवली नागाव ग्रामपंचायतीचे सलग २५ वर्षे सरपंच होते. राजकारणाचा वारसा परीक्षित ठाकूर यांना घरातूनच मिळाला आहे. २००४ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी परीक्षित ठाकूर यांनी निवडणूक लढवली व सरपंच पदावर विराजमान होऊन यशस्वी कारभार केला.५ वर्षात नागाव ग्रामपंचायतीत पाणी रस्ते वीज संदर्भात अनेक कामे केली. ओएनजीसीच्या माध्यमातून गावचा विकास केला. परीक्षित ठाकूर यांनी सरपंच पदाच्या काळात जनतेला स्वच्छ पारदर्शक कारभार दिला. या काळात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. गावच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. २००४ मध्ये मधुकर शेठ ठाकूर हे आमदार असताना अनेक विकासकामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. परीक्षित ठाकूर यांचे वडील आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर हे ओएनजीसी कंपनीत युनियन लीडर असल्याने नागाव ग्रामपंचायत साठी नेहमी भरीव आर्थिक मदत मिळाली आहे.
समाजकारण राजकारण करीत असताना परीक्षित ठाकूर यांनी २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.२०२२ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार, मंत्री सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी महत्त्वाचा पदभार यशस्वीपणे सांभाळला.उरणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक निवेदने पत्रव्यवहार त्यांनी केला.पत्रव्यवहाराच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय दिला.अटल सेतू वर सर्वसामान्य साठी बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.मंत्री आदितीताई तटकरे या नेहमी परीक्षित ठाकूर यांच्या उरण मधील निवास स्थानी भेट देत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण मधुकर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षित ठाकूर यांची विविध विकासकामे चालू आहेत. परीक्षित ठाकूर यांचे सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे.त्यामुळे परीक्षित ठाकूर यांनी केगाव पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेने केली आहे. स्वच्छ चारित्र्य संपन्न,मनमिळावू,भ्रष्टाचार मुक्त कारभार, विश्वासू असा चेहरा असलेले परीक्षित ठाकूर हे बहुमताने निवडून येतील अशा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment