उरण मध्ये चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर निकाल ७ फेब्रुवारीला !!
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका त्वरित पार पडणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक एकाच दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा एकत्रित निकाल लागणार आहे. उरण तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. दिनांक १६ जानेवारी २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा सुरवात झाली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहेत.
एकूण जिल्हा परिषद व त्यांचे आरक्षण
१)नवघर - सर्वसाधारण स्त्री
२)जासई - नागरिकांचा मागस प्रवर्ग (ना.मा.प्र )
३)चाणजे - सर्वसाधारण स्त्री
४)चिरनेर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र)
पंचायत समिती व त्यांचे आरक्षण
१)नवघर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)
२)भेंडखळ -सर्वसाधारण
३)जासई -सर्वसाधारण स्त्री
४)चिर्ले -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (ना. मा. प्र. स्त्री )
५)केगाव -सर्वसाधारण
६)चाणजे - सर्वसाधारण
७)चिरनेर -सर्वसाधारण स्त्री
८)आवरे - सर्वसाधारण स्त्री
No comments:
Post a Comment