स्व.ठकुबाई बळीराम मुंबईकर यांचे वृद्धापकाळाने निधन
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्या मातोश्री स्व. ठकुबाई बळीराम मुंबईकर यांचे सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पाच मुलगे, सुना, नातवंडे , पंतवंडे असा मोठा गोतावळा आहे.
स्व. ठकुबाई बळीराम मुंबईकर यांनी आपल्या जिवन प्रवासात अत्यंत बिकट परिस्थितीत काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांचे पालनपोषण करून त्यांना चांगल शिक्षण देऊन चांगल्या मार्गाला लावले आज त्यांची पाच ही मुलं अगदी सुस्थितीत असून समाजात आपलं नाव कमावून चांगल जिवन जगत आहेत.
स्व. ठकुबाई मुंबईकर यांची होम विधी शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी तर दशक्रिया विधी बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे होणार आहे आणि उत्तरकार्य विधी शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी उरण - वेश्वी येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment