*नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण वर्ग क्र. ३/२०२६ यशस्वीरित्या संपन्न !!
कल्याण, दि.२०, (विश्वनाथ राऊत) : नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने व निर्देशानुसार जानेवारी २०२६ मध्ये दि. १२ ते १९ या कालावधीत सकाळी १०.०० ते दुपारी १४.०० या वेळेत नागरी संरक्षण मूलभूत पाठ्यक्रम क्र. ३/२०२६ चे आयोजन रॉयल कला व वाणिज्य महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे येथे करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण वर्गात एकूण ३२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान नागरी संरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर व्याख्याने व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण सहाय्यक उपनियंत्रक श्री. आननसिंग गढरी यांनी केले. प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा श्री. बिमल नथवाणी, उपमुख्य क्षेत्ररक्षक व मान. निदेशक, क्षेत्र-१, ठाणे तसेच विभागीय क्षेत्ररक्षक तथा मान. निदेशक श्री. हनुमान चौधरी, डोंबिवली यांच्या सहकार्याने घेण्यात आली.
दि. १९/०१/२०२६ रोजी प्रशिक्षणाची सांगता व समारोप समारंभ पार पडला. यावेळी मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव सर उपस्थित राहून नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना शपथ देण्यात आली तसेच त्यांनी स्वयंसेवकांना मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
समारोपीय समारंभास रॉयल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे संचालक शहा सर, महाविद्यालयातील सर्व सहभागी प्राचार्य व प्राध्यापकवृंद, क्षेत्र ३ (उल्हासनगर) चे उपमुख्य क्षेत्ररक्षक व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव, तसेच वरिष्ठ स्वयंसेवक डॉ. श्री. किशोरजी आढळकर हे मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षण काळातील विविध उपक्रमांची छायाचित्रे माननीय महोदयांच्या माहिती व अवलोकनार्थ सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
(सोबत महाविद्यालयीन सहभागी विद्यार्थी, प्राचार्य व प्राध्यापकांची यादी जोडलेली आहे.)
Royal College of Science & Commerce...
NAAC accredited
Affiliated to University of Mumbai.
Managed by Dombivli Yuvak Education Trust
President Sir
Shri. Vanil Shah
Managing Trustee
Mrs. Pooja Shah
Principal Sir
Dr. Vivekkumar Patil
Director Sir
Mr. Prashant Shah
IQAC Coordinator
Asst. Prof. Geeta Deevani
Anchor of felicitation:
Asst. Prof. Sonam Kotwani
Prof. Participants:
Asst. Prof.
Chanda Kanaujia
Pooja Guneshwar
Gaurav Rasane
Sunny Punjabi
Lalit Daswani
Mr. Samir Shelar
No comments:
Post a Comment