रात्रशाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सोनवणे ‘सन्मान प्रतिभावंतांचा’ पुरस्काराचे मानकरी !!!
चेंबूर,दि. २१, (विश्वनाथ राऊत) - दि. २० जानेवारी २०२६ रोजी शिक्षण निरीक्षक कार्यालय, बृहन्मुंबई उत्तर विभाग, चेंबूर यांच्या वतीने स्वामी विवेकानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, चेंबूर येथे आयोजित ‘सन्मान प्रतिभावंतांचा’ या विशेष कार्यक्रमात शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी (पू.) येथील रात्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय अरुण सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
श्री. सोनवणे यांनी रात्रशाळेच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासोबतच राष्ट्रीय व राज्यस्तरावर मोलाचे योगदान दिले आहे. NCERT, नवी दिल्ली येथे आयोजित “Inclusion of Climate Change in Education” या राष्ट्रीय सेमिनारसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती. तसेच भोपाळ येथे आयोजित ‘नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती’ या प्रशिक्षण शिबिरासाठी भूगोल विषयासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे येथे अभ्यासक्रम निर्मिती, पाठ्यपुस्तक लेखन तसेच समीक्षण समिती सदस्य म्हणून ते सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्व शैक्षणिक योगदानाची दखल घेत सदर कार्यक्रमात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या सन्मानामुळे रात्रशाळेच्या शिक्षण क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून शिक्षक वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री विश्वनाथ राऊत सर आपले व दे.बातमीदार चे मनःपूर्वक धन्यवाद .
ReplyDelete